शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, सरकारने पूर्ण केले 'हे' काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 6:41 PM

Mumbai Ahmedabad Bullet Train: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train: महाराष्ट्र आणि गुजरातसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) सोमवारी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 100 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही 'एक्स' वर जमीन अधिग्रहणाची माहिती दिली.

मुंबई आणि अहमदाबाददरम्यान हाय स्पीड रेल्वे लाइन तयार केली जाता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, या प्रकल्पासाठी लागणारी 1389.49 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. एनएचएसआरसीएलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, या प्रकल्पाचे सर्व कॉन्ट्रॅक्ट गुजरात आणि महाराष्ट्राला देण्यात आले होते. तसेच, 120.4 किमी गर्डर सुरू करण्यात आले असून, 271 किमी घाटाचे कास्टिंगही पूर्ण झाले. 

पहिल बोगदा 10 महिन्यांत पूर्ण एनएचएसआरसीएल म्हणाले की, गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील जारोली गावाजवळ फक्त 10 महिन्यांत 350 मीटर लांबी आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा पूर्ण झाला आहे. तसेच, सूरतमध्ये 70 मीटर लांबी आणि 673 मेट्रिक टन वजनाचा पहिला स्टील ब्रिज एनएच 53 वर बांधला गेला असून, अशा 28 पैकी 16 पुल बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे.

24 पैकी सहा नद्यांवर ब्रिजचे काम पूर्ण या प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, या प्रकल्पांतर्गत 24 नद्यांपैकी सहा नद्यांवर, पार (वालसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वालसाड जिल्हा) आणि वेंगानिया (नवसारी जिल्हा) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय, नर्मदा, तापी, माही आणि साबरमती नद्यांवरील काम सुरू आहे. 

2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार होताहाय-स्पीड रेल्वे लाइन जपानच्या शिनकॅन्सेन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जात आहे. या प्रकल्पाला जपानकडून 88,000 कोटी रुपयांच्या  कर्जासह जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने अर्थसहाय्य दिले आहे. 2022 पर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु भूसंपादनामुळे वेळ लागला. आता 2026 पर्यंत दक्षिण गुजरातमधील सूरत आणि बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईahmedabadअहमदाबादMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात