- महेश चेमटेमुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आठ स्थानके असलेल्या गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महाराष्ट्रात २४६.४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्याला सुरू असलेल्या संभ्रमावस्थेमुळे बुलेट ट्रेनला विरोध करायचा झाल्यास तो फक्त गावकरी करतील, विरोधासाठी कोणत्याही परक्या व्यक्ती किंवा संघटनांना गावात प्रवेश करू देणार नसल्याचा ठराव डहाणू, पालघर, तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मंजूर केल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी दिली.विरातन खुर्द येथील गावकºयांनी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच भूसंपादनासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. गावात रुग्णालय, शाळा या सोयी देण्याबरोबरच पाणीप्रन सोडवावा, अशी भूमिका गावकºयांनी मांडली. त्यानुसार, रेल्वे कंटेनरमध्ये उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरेंच्या हस्ते त्यांचे लोकार्पण होईल. पालघर जिल्ह्यातील ७३ गावांमधील २२१ हेक्टर जमीन बुलेट प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. गावकरी आणि स्थानिकांशी चर्चा केली असता, जमीन देण्याबाबत त्यांनी नाराजी दर्शविली.गुजरातमधील १९४ गावांना नोटिसाबुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील आठ स्थानकांसाठी अहमदाबाद ते बलसाड मार्गावर १९६ गावांतील ९६६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी ६.६४ हेक्टर जमीन वनविभागाच्या अखत्यारित असून, १२४ हेक्टर जमीन रेल्वेची आहे. उर्वरित ७५३ हेक्टर जमीन खासगी मालकीची आणि ८९ हेक्टर जमीन गुजरात सरकारच्या मालकीची आहे. गुजरातमधील १९४ गावांना सेक्शन ११ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तूर्तास या गावातील जमीनधारकांना बुलेट प्रकल्प वगळता अन्य कुणाशीही जमीन विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत, असे त्यात म्हटले आहे.
बुलेट ट्रेनचे काम गुजरातमध्येच वेगाने सुरू; पालघर जिल्ह्यातील अनेक गावांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 11:33 PM