लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यात ज्या बुलेट्स हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळाल्या, त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नसतील तर तो तिसरा कोण आहे ? वरिष्ठ वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांना पत्रपरिषदेत केला.
घटिताच्या आड दडलंय काय?
आंबेडकर म्हणाले, उमुंबईवर हल्ला झाला ते खरे आहे, याला पाकिस्तानने रसद पुरवली याबाबत दुमत नाही; पण या घटनेच्या आड कोणीतरी दुसरी घटना घडवून आणलीय का? याचा खुलासा निकम यांनी करावा. पोलिस अधिकाऱ्यांना लागलेल्या बुलेट्स ज्यावेळी मॅच झाल्या नाहीत, तेव्हा त्या बुलेट्स कोणत्या शस्त्रातील होत्या? याचा खुलासा करावा.
पुतळे जाळा पण...
माझे पुतळे कोणाला जाळायचे असतील त्यांनी जाळावेत, माझ्या प्रश्नाचे उत्तर उज्ज्वल निकम यांनी द्यावे. जे आरोपी आहेत त्यांच्या शस्त्रातील बुलेट्स नाहीत, मग कोणत्या शस्त्रातील आहेत, याची चौकशी का केली नाही, असा सवालही केला.