शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

खारघरमधील अधिराज गार्डन इमारतीमध्ये घरफोडी

By admin | Published: March 04, 2017 2:37 AM

मुंबईसह अनेक उपनगरांत झालेल्या घरफोड्या, चोऱ्यांमध्ये चड्डी बनियान टोळीचा हात असल्याचे उघड झाले

पनवेल : मुंबईसह अनेक उपनगरांत झालेल्या घरफोड्या, चोऱ्यांमध्ये चड्डी बनियान टोळीचा हात असल्याचे उघड झाले आहे. उच्चभ्रू वसाहतीत प्रवेश करून हे गुन्हेगार घरातील मौल्यवान ऐवज लंपास करतात. ही घटना खारघर सेक्टर ५ मधील अधिराज गार्डन या उच्चभ्रू वसाहतीत गुरुवारी रात्री ३ ते ४ च्या सुमारास घडली. घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिराज गार्डन या बिल्डिंगमध्ये ई विंग २०१ मध्ये राहणाऱ्या अर्चना विवेक भोसले यांच्या घरात ही चोरी झाली. चड्डी बनियान परिधान केलेल्या तीन व्यक्तींनी मध्यरात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी इमारतीत प्रवेश केला. सुमारे तासाभरातच त्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातून महागड्या वस्तू, ज्वेलरी चोरून पळ काढला. विशेष म्हणजे या बिल्डिंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये तिघांचे चित्रीकरण झाले आहे. खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर हे या घटनेचा तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. जेव्हा चोरी झाली तेव्हा घरमालक गावी गेले होते. शेजाऱ्यांनी त्यांना चोरीसंदर्भात माहिती दिली. >खारघरमध्ये घरफोडीत चड्डी बनियान गँगचा हात असल्याची ही पहिलीच घटना आहे. अधिराज गार्डन ही इमारत खारघरमधील पर्वतरांगांच्या हाकेच्या अंतरावर आहे. पर्वतरांगांतच हे चोरटे पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर खारघरमधील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. >दरोड्यासाठी आलेल्या चौघांना कोपरखैरणे पोलिसांनी केली अटकबँकेवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या चौघांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी दबा धरून बसल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर झडप टाकण्यात आली. या कारवाईत दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. घणसोली सेक्टर ५ येथे गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी ही कारवाई केली. त्याठिकाणी उभ्या असलेल्या कारमधील व्यक्ती संशयित असून दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक उमेश मुंडे, उपनिरीक्षक कैलास मुंबईकर यांच्या पथकाने त्याठिकाणी धडक दिली. पोलिसांनी घेरल्याचे समजताच कारमध्ये लपलेल्या ६ जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. श्रीकांत गोडबोले (२२), आकाश हाटकर (२१), सिराज शेख (२९) व दीपक ऊर्फ इंद्र झा (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते सर्व जण मुंबई व ठाणे परिसरातले राहणारे असून सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी बँकेत एकट्या ग्राहकाला फसवून रक्कम लुटण्याचे गुन्हे देखील दाखल आहेत.