ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २४ - होळी साजरी करताना कोणीही हुल्लडबाजी करु नये यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन तंबी दिली आहे. होळीच्या दिवशी अनेक ठिकाणी छेडछाड, फुगे मारणे अशा घटना समोर येत असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अशा हुल्लडबाजांना कायदा-सुव्यवस्थेचं उल्लंघन न करण्याची तंबीच दिली आहे. लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी चेतावणी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्विटरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर अकाऊंट सुरु केल्यापासून मुंबई पोलीसांचे ट्विट चर्चेचा आणि कौतुकाचा विषय राहिला आहे. सरळ भाषेत न सांगता उपहासात्मकरित्या सांगत असल्याने हे ट्विट लोकांना खुप आवडत आहेत. यावेळीदेखील पोलिसांनी #बुरानाबनोहोलीहै हा हॅशटॅग वापरला आहे. तसंच त्यातील मेसेजही वाचण्यासारखे आहेत.
मुंबई पोलिसांचे @MumbaiPolice आणि @CPMumbaiPolice हे ट्विटर अकाऊंट सर्वात जास्त फॉलो केले जातात. होळीनिमित्त तंबी देण्याच्या निमित्त पोलिसांनी टाकलेले ट्विटदेखील वाचण्यासारखे आहेत.
Be holy this holi. #बुरानाबनोहोलीहैpic.twitter.com/aepJKtb56u— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 21, 2016
Two is company, three is crime. #बुरानाबनोहोलीहैpic.twitter.com/7PfPdwNLq9— Mumbai Police (@MumbaiPolice) March 21, 2016
We will burst your bubble if you throw that balloon at her #बुरानाबनोहोलीहै— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 23, 2016
Our 'Good Morning Squad' is spread across the city to ensure it's a good day indeed #HappyHoli#बुरानाबनोहोलीहैpic.twitter.com/N7U3rthdcm— Mumbai Police (@MumbaiPolice) March 24, 2016