शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मराठवाड्यात जाळपोळ, दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:46 AM

आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव येथे नदी उडी मारल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला मंगळवारी मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण लागले.

औरंगाबाद : आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव येथे नदी उडी मारल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला मंगळवारी मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण लागले. घनसावंगीत पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी गोळीबार केला. सहा ठिकाणी कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलनावेळी एका पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विभागात अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन झाले.बीड जिल्ह्यात आंदोलकांवरील दगडफेकीत चौघे जखमी झाले. गेवराईत सोमवारी रात्री माजलगाव- पुणे बसवर दगडफेक झाली. हिंगोलीत बंदला हिंसाचाराचे गालबोट लागले. हिंगोली, वसमत येथे बसवर दगडफेक झाली. खानापूर चित्ता येथे जमावाने पोलिसांची जीप जाळली. वसमत येथे दगडफेकीत पोलीस उपअधीक्षक शशीकिरण काशिद जखमी झाले.परभणी जिल्ह्यात ४ आगारातील १८०० बस फेºया रद्द झाल्या. परभणीत आझम चौक येथे दोन गट समोरासमोर आले. पोलीस तातडीने तेथे दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. लातूरला शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठा आणि बस सेवा बंद होती. उस्मानाबादला उमरगा येथे मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़नांदेडला लाठीमारनांदेडला आंदोलक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली़ पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला़ आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या वाहनांचे नुकसान झाले़ पोलिसांच्या लाठीमारात सहा ते सात कार्यकर्ते जखमी झाले़ दगडफेकीत पोलीस कर्मचारी गणेश मिटके गंभीर जखमी झाले़ मुखेडमध्ये दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली़औरंगाबादमध्ये बाजारपेठा बंद होत्या. पैठणगेट ते नूतन कॉलनी येथे किरकोळ दगडफेक झाली.गोदावरीत आंदोलनाचा प्रयत्नऔरंगाबादच्या घटनेनंतर नाशिकमध्येही विलास कदम या तरुणाने गोदावरीच्या प्रवाहात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढले.खान्देशात बंद शांततेतजळगाव, धुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, ठिय्या आंदोलने झाली. धुळे-औरंगाबाद थेट बस सेवा पोलिसांच्या सूचनेनुसार चाळीसगावपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्रात रास्ता रोकोकोल्हापुरला मोटारसायकल रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने झाली. सकल मराठा समाजाच्या सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सांगली दौºयावर असलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वाहनांचा ताफा कवठेमहांकाळ येथे अडविण्यात आला होता. साताºयात आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली.विदर्भातही ठिय्यानागपुरला महाल, रेशीमबाग, सक्करदरा परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विदर्भात काही ठिय्या आंदोलन झाले. मुख्यमंत्र्यांविरुद्ध अमरावतीमधील कोतवाली ठाण्यात सामूहिक तक्रार करण्यात आली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्र