रिसोड (जि. वाशिम), दि. ८- तालुक्यातील ग्राम मोठेगाव येथील ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आलेल्या रणजीत देशमुख या आरोपीस बुधवारी न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यास १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या प्रकरणातील महिलेचा ६ मार्चला मृत्यू झाला होता. त्यानंतर उजेडात आलेल्या या घटनेप्रकरणी आधीच गुन्हा दाखल असलेल्या रणजीत देशमुख या आरोपीस पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यास बुधवारी न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता, न्यायालयाने देशमुखला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.
जळीत हत्याकांडातील आरोपीस १४ मार्चपर्यंत कोठडी!
By admin | Published: March 09, 2017 2:08 AM