धुळे : बनावट पत्त्यावर किराणा माल मागवून जळगावच्या व्यापाऱ्याला ६१ लाखांना गंडविल्याचे उघडकीस आले आहे़ याप्रकरणी मुंबईतील पाच भामट्यांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकास अटक करण्यात आली आहे.जळगावच्या शिव कॉलनीतील दत्तात्रय खंडू महाजन (६४) यांची धुळे शहराजवळील अवधान औद्योगिक वसाहतीत बेसन पीठ, चक्की आटा, रवा व मैदा तयार करणारी कंपनी आहे. २५ मे ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत अनिल गोरडीया यांच्यासह पाच जणांनी गोविंदा ट्रेडींग कंपनी, माँ शारदा ट्रेडर्स, साई स्टोअर्स, दीपक स्टोअर्स, दुर्गा ट्रेडिंग स्टोअर्स, गणेश ट्रेडर्स यासह १५ ते १६ दुकानांच्या नावावर वेळोवेळी बनावट पत्यांवर किराणा मालाची मागणी केली़ संबंधितांवर विश्वास ठेवून दिलेल्या पत्त्यावर महाजन यांनी माल पाठविला़ मात्र त्यांनी पैशाची टाळाटाळ केली. महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ब्रोकर अनुप शांतीलाल गारेडीया (रा़ मेन रोड, महावीर नगर, कांदिवली), गोविंद प्रजापती (नालासोपारा-पूर्व), राहुल शर्मा (नालासोपारा पूर्व), संतोष भोईर (विरार पूर्व), सुरेश जयस्वाल (नालासोपारा पूर्व) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ पाच जणांपैकी अनुप शांतीलाल गोरडीया याला पोलिसांनी धुळ्यात अटक केली़
व्यापा-याला ६१ लाखांना गंडविले
By admin | Published: October 13, 2014 5:21 AM