शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

रोमँटिक वर्षासहलीसाठी बुशी डॅम

By admin | Published: August 10, 2014 12:08 AM

मोस्ट रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून बुशी डॅमचा उल्लेख केला जातो. वर्षासहलीसाठी तर ते अधिकच रोमँटिक आहे.

 नंदकुमार टेणी ल्ल ठाणो
मोस्ट रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून बुशी डॅमचा उल्लेख केला जातो. वर्षासहलीसाठी तर ते अधिकच रोमँटिक आहे. ब्रिटिशांनी रेल्वेला   पाणीपुरवठा करण्यासाठी हे छोटेखानी धरण बांधले. त्याच्या बंधा:याखाली दोन-दोन फूट रुंदीच्या पाय:या केल्या आहेत. त्यामुळे या पाय:यांवर बसून अथवा चक्क लोळून आपल्याला वर्षासहलीचा आनंद मनमुराद लुटता येतो.  पाण्याचा प्रवाह खळाळता पण सौम्य असेल तर भिजण्यातली रंगत आणखी वाढते.  वरून धुवाधार पाऊस, सोबत सोसाटय़ाचे वादळवारे आणि त्याला या अवखळ प्रवाहाची साथ म्हणजे रोमँटिक त्रिवेणी संगमच असतो. जर सोबत मैत्रीण अथवा सौ असेल तर या सहलीची मजा अविस्मरणीय होऊन जाते. 
लोणावळ्याजवळ हा डॅम आहे. मुंबई, ठाणो, कल्याण येथून हे अंतर 85 ते 9क् कि.मी. एकेरी आहे. म्हणजेच जाताना रस्ता दोन तासांचा आणि येताना दोन तासांचा. भिजायला चार-पाच तास आणि च्याऊम्यॅऊ साठी एक तास असे नऊ-दहा तास  हाताशी असतील तर वर्षासहल बुशी डॅमलाच काढावी. ती जर दुचाकीवरून काढली तर जास्त परवडते. कारण जाताना-येताना चारचाकी वाहनांना जो टोल भरावा लागतो त्या टोलच्या पैशात दुचाकीचे पेट्रोल निघून जाते. शिवाय दुचाकीवरून सुसाट जाताना वर्षासहलीचा आनंद व भिजण्यातील मौज अधिक लुटता येते.
सकाळी 6 किंवा 7ला घराबाहेर आपल्या ग्रुपसोबत पडायचे. वाटेत पनवेल किंवा खोपोलीला चहा-कॉफी घ्यायची. लोणावळ्याला ब्रेकफास्ट करायचा आणि सरळ बुशी डॅम गाठायचा. लोणावळा ते डॅम हे अंतर अध्र्या तासाचे पण नाही. येथे खाद्यपदार्थ मिळतात. परंतु ते चकन्यासारखे खायचे आणि रस्त्यावरच्या एखाद्या नामांकित धाब्यावर शेवभाजी, भरीत भाकरी अशा गावरान मेनूचे जेवण करायचे ही खरी या सहलीची मजा.
येताना खोपोलीमधील गोल कांदाभजी, मिरचीची भजी याचा चहासोबत आस्वाद घ्यायचा. म्हणजे या सहलीची मजा आणखी वाढते. त्यात जर आणखी चस्का मारायचा असेल तर जेवणाचे डबे घरून न्यायचे आणि मुसळधार पावसात एखाद्या डेरेदार वृक्षाखाली सगळ्यांनी भरपावसात अंगत-पंगत करायची असाही बेत करता येतो. बसने जायचे असेल तर लोणावळ्याला पोहोचायचे आणि तेथून डॅमर्पयत जाण्यासाठी रिक्षा पकडायची हा मध्यम मार्गही वापरता येतो. परंतु त्यात वर्षासहलीचे थ्रील मात्र गवसत नाही.
 
च्बुशी डॅमला जाताना एक लक्षात ठेवायचे ते म्हणजे, वाहनाची गती चाळीसच्या पुढे न्यायची नाही. तसेच अंधार पडण्याआत परतायचे. कारण अनेकदा रस्त्यावर खड्डे असतात त्याचा अंदाज आला नाही तर अपघात किंवा वाहन बंद पडणो असे घडू शकते. 
च्तसेच डॅमच्या पाय:यांवर चालताना त्यावर शेवाळे साठून त्या निसरडय़ा झालेल्या नाहीत ना? तसेच पाण्याचा प्रवाह किती गतिमान आहे, याची खात्री करून घ्यायची. जर पाय:या निसरडय़ा  आणि प्रवाहाचा वेग जास्त असेल तर धबधब्याखालील कुंडात डुंबणो हे अधिक उत्तम ठरते.  मग सांगा कधी निघताय बुशी डॅमच्या वर्षासहलीला!