शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

"...पण भ्रष्ट संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे," भाजप नेत्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:58 PM

"पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत"

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज (रविवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने  त्यांच्या मुंबईतील भांडूप परिसरामधील मैत्री बंगल्यावर धाड टाकली. येथे ईडीकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर, आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊतांवरील कारवाईनंतर भातखळकर यांनी ट्विट करत, "स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या अपमानामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला नव्हता.... पण भ्रष्ट संजय राऊत यांच्यावर कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे," असे ट्विट केले आहे.

एवढेच नाही, तर आणखी एका ट्विट मध्ये भातखळकर म्हणाले, "करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही.... ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत." या शिवाय, "पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत," असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी एकामागून एक काही ट्वीट्स केले आहेत, येका ट्विटमध्ये शिवसेनेचे चिन्ह टाकत, तरीही शिवसेना सोडणार नाही, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असे म्हटले आहे. यानंतर त्यांनी ईडीच्या कारवाईवरही एक ट्वीट केले आहे. “खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र,” असेही राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना