अकोला, दि. १७- राज्यातील कापूस खासगी बाजारात दररोज १ लाख २0 हजार क्विंटल कापसाची खरेदी होत असून, आतापर्यंत १ कोटी ३४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. दरही स्थिर असून, भविष्यात वाढण्याची शक्यता कापूस तज्ज्ञांनी वर्तविली आहे.कापूस वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आजमितीस राज्यातील कापूस बाजारात कापसाची आवक दररोज १ लाख २0 हजार क्विंटल आहे, तर देशात दररोज जवळपास १0 लाख क्विंटलची आवक आहे. दरम्यान, आतापर्यंत कापसाचे दर हे ५७00 ते ५९00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. अकोला जिल्हय़ातील अकोट येथील कापूस बाजारात कापसाचे प्रतिक्विंटल दर हे सहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मागील दहा वर्षांत यावर्षी वाढलेले कापसाचे दर हे सर्वाधिक आहेत. आता तर मागील पंधरा दिवसांपासून दर स्थिर असल्याने भविष्यात दर वाढण्याची शक्यता कापूस उद्योजकांनीच वर्तविली आहे.सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर स्थिर आहेत. परिणामी देशातही कापसाचे दर स्थिर आहेत. त्याचमुळे शेतकर्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. मार्च महिन्यात मात्र ही विक्री वाढण्याची शक्यता कापूस व्यापार्यांनी वर्तविली आहे. उन्हाळ्य़ात कापसातील ओलावा कमी होतो आणि वजन घटत असल्याने शेतकरी कापूस विकतोच असे व्यापार्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच शेतकर्यांनी टप्प्या टप्प्याने कापूस विकावा, शेतकर्यांकडे २0 क्विंटल कापूस असेल, तर त्यांनी त्यातील पाच क्विंटल कापूस विकून सध्या असलेल्या दराचा फायदा घ्यावा, असे कापूस तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पणन महासंघाची शून्य खरेदीयावर्षी पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र उघडली आहेत, पण आतापर्यंत या केंद्रावर शेतकर्यांनी कापूस विकला नाही.- राज्यात आतापर्यंत १३४ लाख क्विंटल कापूस व्यापार्यांनी खरेदी केला आहे. सध्या कापसाचे दरही स्थिर आहेत. भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.- सध्या कापसाचे दर ५८00 रुपये क्विंटलपर्यंत आहेत. शेतकर्यांनी टप्प्या-टप्प्याने विकून या दराचा फायदा घ्यावा. कारण कापसाच्या दराचे काही सांगता येत नाही.- डॉ.एन.पी. हिराणी,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महांसघ,मुंबई.