शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

मृतांच्या संख्येपेक्षा जास्त लाकडाची खरेदी

By admin | Published: December 07, 2014 12:30 AM

महापालिकेत विविध कामात भ्रष्टाचाराचे आरोप होणे काही नवे नाही. बरेच आरोप राजकीय हेतूनेही असतात. पण महापालिकेत दहनघाटावर लाकडांचा पुरवठा करण्यातही घोटाळा झाला आहे.

प्रत्येक प्रेतामागे ७५ किलोंचा घोटाळा : अंकेक्षण अहवालात ताशेरेनागपूर : महापालिकेत विविध कामात भ्रष्टाचाराचे आरोप होणे काही नवे नाही. बरेच आरोप राजकीय हेतूनेही असतात. पण महापालिकेत दहनघाटावर लाकडांचा पुरवठा करण्यातही घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे ही बाब कुण्या राजकीय व्यक्तीने नव्हे तर २०११-१३ दरम्यान झालेल्या लेखा परीक्षण अहवालाने समोर आणली आहे. एक प्रेताच्या अंत्यविधीसाठी ३०० किलो लाकूड दिले जाते. मात्र, कंत्राटदाराने जाळलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा जास्त लाकडाची खरेदी केल्याचे दाखवून प्रत्येक प्रेतामागे ७५ किलो लाकडाचे जास्ती पैसे उचलले आहेत. मयतीच्या लाकडात घोटाळा करणाऱ्यांवर महापालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दहन घाटांवर मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जाळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने २०१०-११ व २०११-१२ या या वर्षांसाठी अंदाजे ४६८५ मे. टनाची १ कोटी २६ लाख ७ हजार ३३५ रुपये खर्च अपेक्षित असलेली निविदा बोलावली. महेश सेल्स यांची निविदा २८ मे २०१० रोजी स्थायी समितीने मंजुर केली. १५ जून २०१० रोजी करारनामा करण्यात आला. महेश सेल्स यांच्याकडून २०११-१२ मध्ये ४८५७.८६५ मे.टन लाकूड खरेदी करून १ कोटी ३० लाख ७५ हजार ३५८ रुपये प्रदान करण्यात आले. २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांसाठी ६६७५ मे. टनासाठी १ कोटी ९० लाख २३ हजार ७५० रुपये अपेक्षित खर्चासाठी निविदा मागविण्यात आली. यावेळीही महेश सेल्स कॉर्पोरेशन यांची प्रति मे.टन ४४९१ रुपये दराची निविदा ७ आॅगस्ट २०१२ रोजी स्थायी समितीने मंजूर केली. परंतु वाटाघाटीमध्ये १६ आॅक्टोबर २०१२ रोजी महेश सेल्स कॉर्पोरेशन यांनी ४४९१ रुपये प्रती टन ऐवजी ४०४१ रुपये प्रति टन दराने पुरवठा करण्यास संमती दिली व आयुक्तांनी १९ आॅक्टोबर २०१२ रोजी निविदा मंजूर केली. २०१२-१३ मध्ये ५५८६.६२ मे.टन लाकूड खरेदी करून १ कोटी ७४ लाख ११ हजार ६५९ रुपये प्रदान करण्यात आले. मात्र, लेखा परीक्षण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मृतांच्या नोंदवहीत असलेली मृतांची आकडेवारी व प्रत्यक्षात घाटावर देण्यात आलेली लाकडे यात मोठी तफावत आढळून आली आहे. एका प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घाटांवर ३०० किलो लाकडे दिली जातात. मात्र, याचा हिशेब केला अशता २०११-१२ मध्ये दहन केलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा तब्बल ९४७.३६५ टन लाकूड जास्त देण्यात आल्याचे दाखवून कंत्राटदाराने महापालिकेकडून अतिरिक्त पैशाची उचल केली. २०१२-१३ मध्ये देखील १५५४.९२ टन लाकूड जास्त देण्यात आल्याचे दाखवून अतिरिक्त पैशाची उचल केली आहे. २०११-१२ मध्ये २६२९ रुपये प्रति टन प्रमाणे हिशेब केला असता २५ लाख ४९ हजार ३५९ रुपये व २०१२-१३ मध्ये सरासरी दर ३३६६ रुपये प्रमाणे ५२ लाख ३३ हजार ८६० रुपये जास्तीचे घेण्यात आले आहेत. अशा प्रकारे कंत्राटदाराने २०११ ते २०१३ या दोन वर्षात प्रत्यक्षात पुरवठा केलेल्या लाकडापेक्षा तब्बल ७७ लाख रुपये जास्तीचे उचलल्याचे अंकेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)