"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 02:06 PM2024-12-02T14:06:53+5:302024-12-02T14:07:26+5:30

Praniti Shinde : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

"By coming through back roads, manipulating EVMs...", Praniti Shinde's big accusation against BJP | "मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप

"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप

सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी (दि.१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. निवडणुका जिंकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही. कारण, त्यांना माहीत आहे की, ते ईव्हीएम मॅनिप्युलेट करून निवडणुका जिंकले आहेत. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही नाही, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टीमध्ये त्यांनी षडयंत्र केलं. हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वाची लढाई नव्हती. तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, असे प्रणित शिंदे म्हणाल्या.

सीडब्ल्यूसीच्या मिटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले, आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं. पण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झालेला आहे. तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे. कारण ते मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅन्यूपुलेट करून १३३ च्या जवळपास पोहोचलेत. त्यामुळेच भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही, तुम्ही निरीक्षण करून बघा, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

दरम्यान, एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु गेल्या २५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव जागा देखील गमावल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे.काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीन जागा लढवल्या होत्या, मात्र येथील मतदारसंघातील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.

Web Title: "By coming through back roads, manipulating EVMs...", Praniti Shinde's big accusation against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.