मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत : विलासकाकांचे पुनर्वसन करू
यदु जोशी - मुंबई
मी विधानसभेची निवडणूक दक्षिण कराडमधूनच लढणार आहे. दुसरीकडे जाणार नाही. तेथील आमचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न आहे. ते करण्याचा प्रय} सुरू आहे. माङयाच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वादग्रस्त विधाने, नियमात असो नसो पण कामे रेटून नेण्याची राष्ट्रवादीची दबंगगिरी याची बाहेर चर्चा होते. याबद्दल काय वाटते?
मुख्यमंत्री : आघाडी म्हणून सरकारवरील आरोपांचं उत्तर मला द्यावं लागतं. माझं मत असं आहे की, नियम आणि कायद्याच्या चौकटीतच कामं झाली पाहिजेत. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही नियम बदला पण त्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेण्याची भूमिका योग्य नाही. आमचेही (काँग्रेस) काही लोक नियम डावलून जायला बघतात, हे योग्य नाही.
केवळ सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना जादा विकास निधी देण्यात आला, या आरोपात कितपत तथ्य आहे?
- पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे. प्रचलित व्यवस्था स्वीकारली गेली, पण समजा उद्या कोणी त्याला कोर्टात आव्हान दिलं तर कदाचित कायद्यानं ही पद्धत थांबविता येईल.
नेत्यांच्या मुलांना, नातलगांना तिकीट द्यावं की देऊ नये?
- जे लोक स्वकर्तृत्वावर राजकारणात पुढे आले असतील तर त्यात गैर काही नाही. पण केवळ नेत्याचा नातलग म्हणून वर्णी लागता कामा नये.
विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
काँग्रेसच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
टोलबाबत भुजबळच उत्तर देतील
दोन टोलनाक्यांमध्ये 6क् किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असले पाहिजे, असे केंद्र सरकारचे पूर्वीपासूनचे धोरण असताना आपल्याकडे 15 किलोमीटरच्या आत दुसरा टोलनाका उभारण्याचे प्रकार का घडले, याचे उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हेच देऊ शकतील. रस्ते, पूल बांधून त्यावर टोल वसुलीचे कंत्रट आधीच दिले गेले होते. त्यामुळे सगळे झाल्यावर मी निर्णय कसा बदलणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.