ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढील सुनवाणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. संशयित आरोपी समीरला सुरक्षेच्या कारणास्तव आज कोर्टात हजर करता आले नाही. १६ फेब्रुवारी रोजी कॉ. पानसरे यांच्या हत्येला एक वर्ष पुर्ण होत आहे. तरी अद्याप निकाल लागला नाही याबद्द पानसरे यांच्या नातेवाईकांनी खंत व्यक्त केला आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती.
खटला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी वा मुंबईत वर्ग करावा, अशी याचिका त्याच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार होती पण सुरक्षेच्या कारणास्तव समीरला कोर्टात हजर करता आले नाही. पानसरे कुटुंबीयांतर्फे ज्येष्ठ वकील अभय नेवगी, तर शासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या बाजू मांडत आहेत. १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्यापुढे समीरवर दोषारोपपत्र दाखल झाले.