मुंबई - मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबार वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वनसमृद्धी योजनेला मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 च्या कलम 73 मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत - मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्षलागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वन समृद्धी योजनेला मान्यता.- अक्कलकोट नगरपरिषदेस यात्राकर लागू करण्यास मान्यता.- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 च्या कलम 73 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पास (ता. मंगळवेढा) फेररचनेसह सुधारित प्रशासकीय मान्यता.करणार.- धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ (कनोली) उपसा सिंचन योजनेच्या प्रथम सुधारित मान्यतेमधील काही अटी शिथिल करण्याचा निर्णय.- महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम-1961 मधील कलम 17, 18 व 23 अ मध्ये सुधारणा करणार.- दी नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब अधिनियम-1956 मध्ये सुधारणा.- कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा.
कन्या वन समृद्धी योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 3:47 PM