शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पंतप्रधान पिक विमा योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

By admin | Published: January 13, 2016 4:16 PM

नविन पीकविमा धोरणाला आज मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याची माहीती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. या योजने मार्फत प्रीमियम कमी, जास्त विम्याची हमी मिळनार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १३ - नविन पीकविमा धोरणाला आज मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याची माहीती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. या योजने मार्फत प्रीमियम कमी, जास्त विम्याची हमी मिळनार आहे. तर शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मोबाईलचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला विनाविलंब भरपाई मिळणार आहे.

पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोझा कमी करणे, तसेच लवकरात लवकर विमा परताव्याची हमी आणि संरक्षण देणाऱ्या नवीन पीक विमा योजनेस केंद्रीय मंत्रीमंडळाने आज (बुधवार) मंजुरी दिली. नवीन विमा योजनेचा अधिक लाभ बुंदेलखंड, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तर बिहार, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, ओडिशामधील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना ही खरीप पिकांना २% तर रब्बी पिकांना १.५% प्रीमियम भरावा लागणार आहे. हा प्रीमियम आधीच्या तुलनेत सातपट कमी आहे. तर रापवाटीकेच्या नुकसानानंतर लगेच तात्काळ नुकसानभरपाई मिळनार आहे. नवी कृषी विमा योजना देशभरात येत्या जून महिन्यापासून म्हणजेच खरीप हंगामापासून लागू करण्यात येणार आहे. आज मंत्रीमंडळाने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण मिळणार आहे. किचकट प्रक्रिया आणि जाचक अटींतून सुटका होण्याची आशा असल्याच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

चक्रीवादळ, पूर, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीमार्फत वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण परिस्थितीत नुकसान अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.