मुंबई - गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद पेटला आहे. या विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील नाव द्यावं अशी स्थानिकांची मागणी आहे तर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे नावावर आग्रह कायम ठेवला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने पुढील ६ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास २९७ कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता
प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता
करदाते व वस्तू व सेवा कर विभाग यांच्यातील वाद कमी करण्याच्या दृष्टीने सुधारणा
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, २०२१ प्रख्यापित करणार
मुंबईच्या गोरेगांवमधील पत्राचाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करणार
कालबद्ध पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची ग्रीड टप्प्याटप्प्याने करणार, पैठणपासून सुरुवात करण्यास मान्यता