शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर!

By admin | Published: November 25, 2015 3:11 AM

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत असून, विस्ताराची नेमकी तारीख ते अद्याप ठरवू शकलेले नाहीत

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत असून, विस्ताराची नेमकी तारीख ते अद्याप ठरवू शकलेले नाहीत. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन होईपर्यंत विस्तार लांबणीवर टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी विस्ताराबाबत चर्चा केली होती. शहा यांनी विस्तारास हिरवा झेंडा दाखविला असला, तरी भाजपामधून कोणाला संधी द्यायची, यावर एकमत होत नसल्याने विस्तार पुढे ढकलला जाऊ शकतो.स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन मित्रांना मंत्रिपद देण्याची तयारी भाजपाने दर्शविली आहे. रामदास आठवले स्वत: राज्यात मंत्री होणार असतील, तरच त्यांच्या पक्षाला संधी देऊ, अशी अट भाजपाने टाकली आहे. मित्रपक्षांना मान्य होईल, असे सूत्र निश्चित करण्यात भाजपाला अद्याप यश आलेले नाही. शिवसेनेला दोन मंत्रिपदे भरायची आहेत, पण त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी अद्याप नावेदेखील मागविलेली नाहीत. सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही मंत्रिपदाची मागणी करीत आहेत. हे सगळे निस्तारण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यामुळे विस्तार लांबणीवर पडू शकतो. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस, ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष शहा यांची एकमेकांशी चर्चा झाल्यानंतरच नावे अंतिम होतील, असे मानले जाते. विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. नवीन मंत्र्यांना किमान पाच दिवस आधी म्हणजे २ डिसेंबरपर्यंत शपथ द्यावी लागेल. म्हणजे त्यांना आपापली खाती किमान अधिवेशनाला सामोरे जाण्यासाठी समजून घेता येतील. ही सगळी अडथळ्यांची शर्यत पार करीत, मंत्र्यांचा शपथविधी करण्यापर्यंतची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार केला, तर पक्षांतर्गत राजी-नाराजीचा परिणाम अधिवेशनावर होऊ शकतो. त्यापेक्षा विस्तार अधिवेशनानंतरच करावा, असा एक मतप्रवाह भाजपात आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र अधिवेशनापूर्वीच विस्तारासाठी आग्रही असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)