नागपूर : दिल्लीत लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी ‘केबल कार’ सेवा सुरू होणार आहे. येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात केबल कारचा उपयोग हा जगातील पहिला प्रयोग असेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गडकरी यांच्या महालातील वाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दिल्ली येथे मानेसर ते धौलाकुआ दरम्यान ही केबल कार सेवा सुरू केली जाईल. या प्रकल्पात प्रतिकिलोमीटर ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो रेल्वेच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. केबल कारचा वेग साधारणत: ताशी ७० ते ८० किलोमीटर असेल. प्रत्येकात पाच प्रवासी असे एकूण ७०० पॉण्ड केबलद्वारे सतत फिरत राहतील. पुढील महिन्यात या कामाच्या निविदा काढल्या जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
दिल्लीत चालणार केबल कार
By admin | Published: September 18, 2015 2:29 AM