पुणे : काँग्रेसला मत दिले म्हणून बदल घडेल, अशी आशा आता सोडून दिली पाहिजे़. काँग्रेस रसातळाला गेली असून, कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी आजमितीला काँग्रेस पुन्हा उभी राहणे अशक्यच आहे़, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य केले़. दरम्यान भाजपाचा कारभार पाहता देशाची वाटचाल आता हुकुमशाहीकडे चालली असल्याने सक्षम विरोधकाची गरज निर्माण झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. एमआयएमतर्फे आयोजित निवडणुक प्रचार सभेत ओवेसी बोलत होते़. यावेळी खासदार इम्तियाज जलील, उमेदवार जाहिद शेख, डॅनियल लांडगे, हिना मोमीन आदी पदाधिकारी उपस्थित होते़. जहाज बुडताना कप्तान इतरांना प्रथम वाचवितो़. मात्र, काँग्रेसचा कप्तानच लोकसभा निवडणुकीनंतर पळून गेला अशी टीका करून ओवेसी यांनी, महाराष्ट्रातील राजकारणात आता विरोधी पक्ष राहिलेला नसल्याचे सांगितले़. जो पैसे खर्च करून निवडून येत आहेत. तो केवळ पैसे कमविणे हेच उद्दिष्ट ठेवत आहे़. भाजप सरकारची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चालली असून, धर्मांतर करण्याकरिता हिमाचलमध्ये कायदा करून त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे़. दहशतवाद संपविण्याच्या नावाखाली सत्तेत आल्यापासून भाजपने केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट केले आहे़. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी शहिद झालेल्या मुंबई पोलिस दलातील हेमंत करकरे यांच्यावर टीका करणाºयांना भाजपने उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. आपल्या समाजाचा, आपल्या मतावर, आपला माणूस विधानसभेवर निवडून जावा़. तसेच सर्वसामान्यांना वंचितांना न्याय देण्याकरिता विरोधकांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न एमआयएम करीत आहे़. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळते. पण अल्पसंख्याक समाजाला अद्यापही आरक्षण मिळालेले नाही़. धर्मनिरपेक्षततेची गोष्ट करणाऱ्यांनी तरजेबला मारले़. आजही मुस्लिम व्यक्तींना कारागृहात वर्षोनुवर्षे मुद्दाम डांबून ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़.
Maharashtra Election2019: कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काँग्रेस उभारणे अशक्य : असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 11:24 AM
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे
ठळक मुद्देसक्षम विरोधकाची गरज काँग्रेसचा कप्तानच लोकसभा निवडणुकीनंतर पळून गेला अशी टीका