लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे तुरीचे चांगले उत्पादन येऊनही खरेदी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट संसदीय अभ्यास दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला निघून गेले. त्यांना तातडीने परत बोलावून घ्या, असे पत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात यंदा तुरीचे उत्पादन काढले. पण राज्य सरकारचे तूरखरेदी धोरण पूर्णपणे कोलमडले. परिणामी तूर उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा संकटाच्या वेळी या विभागाशी संबंधीत मंत्री परदेशात कसे जाऊ शकतात, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.समान न्याय हवाजर आमच्या मंत्र्यांना परत बोलवा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी असेल तर मग सर्वांना समान न्याय देत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांनाही परत बोलवण्याची भूमिका घ्यावी, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
परदेश दौऱ्यावरून मंत्र्यांना परत बोलवा
By admin | Published: May 06, 2017 4:11 AM