रस्ते बांधायला १५-१७ वर्षे लागतात का, समृद्धी महामार्ग चार वर्षांत होतो. मग कोकणातचे खासदार आमदार काय करतायत कोण बोलतेय गडकरींशी, काय करतात हे लोक, असा सवाल करत राज ठाकरेंनीमनसे कार्यकर्त्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचे आदेश दिले.
चंद्रयान तिकडे खड्डेच पाहणार आहे, महाराष्ट्रात सोडले असते...; राज ठाकरेंचा मिश्किल टोला
दरडी कोसळतायत, त्यात माणसे जातायत. अमेरिकेच एम्पायर इस्टेट बिल्डिंग चौदा महिन्यात बांधली गेली. इकडे १४-१४ वर्षे लागतायत. दुसऱ्या महायुद्धानंतर मंदी आली तेव्हा लोकांमध्ये पैसे तर गेले पाहिजेत. त्यांनी सर्वात आधी रस्ते बांधायला काढले. ते जे सरळ रस्ते दिसतात ते तेव्हा बांधलेले आहेत. तिथेही लोकांनी विरोध केला. तिथल्या राज्यकर्त्याने म्हटले होते की आजची अमेरिकेची पिढी मला शाप देईल, परंतू भविष्य़ातल्या सगळ्या पिढ्या मला आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी सांगितलेले की हवेत उडणाऱ्या बसेस आणणार, लवकर आणा. कोणाच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
पक्ष म्हणून आता तुम्हाला सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावे लागणार आहे. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाहीय. पण आंदोलन असे झाले पाहिजे की सरकार हलले पाहिजे. लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे. तुमचे कोकणावर लक्ष असले पाहिजे. कोण जमिनी पळवतेय ते पहा, कोकणात उद्योग आले पाहिजेत, परंतू, सौदर्य राखून आले पाहिजे. असा प्रदेश सहसा मिळत नाही. परमेश्वराने महाराष्ट्रावर कृपा केलेली आहे. असे आंदोलन करा की सरकारला अशा प्रकारचे आंदोलन झाले होते अशी भीती वाटली पाहिजे. जिथे माझी गरज लागेल तिथे मला बोलवा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले.
मुंबई-गोवा हायवेवर किती खर्च...२००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्य़ाच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय. खड्ड्यातून गेलो आणि मेलो काय? असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला. मुंबई गोवा महामार्गावर १५५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. नितीन ग़डकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की मी घातले लक्ष पण कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरु नाहीय ना? कोकणातल्या जमिनी आहेत त्या धडाधड परप्रांतीयांच्या घशात गेल्या आहेत. नाणार रद्द होतोय हे पाहून बारसू सुरु झाले. भोळसट कोकणी बांधव चिरीमिरीसाठी विकून मोकळा होतोय. पाच हजार एकर जमिन कधी एकत्र पाहिलीय का? कुंपणच शेत खातेय, आपलीच लोक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.