उदयनराजे भोसले : आर्थिक निकष मान्य करा
नाशिक : मराठेतर आरक्षणामुळे समाजात मोठी दुही निर्माण झाली असून, त्यामुळे सामाजिक समता राहिलेली नाही. या विषमतेचा फटका मराठा समाजातील तरुण पिढीला बसला आहे. मराठा समाजातील तरुण आता जागा झाला असून, त्यांच्यामध्ये ही धग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मोर्चाचा विचार करून सरकारने मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी येथे केली. नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चासाठी उपस्थित असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारची धोरणे आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांवर तोफ डागली. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत ‘समानता’ हा एक मुद्दा आहे, परंतु ही समानता खरेच आहे का? आरक्षणाला आमचा विरोध नाही, समाजातील उपेक्षित घटकाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकषांवर मिळायला हवे, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.कालची जी परिस्थिती होती ती आज नाही, त्यामुळे आरक्षण रचनेचा पुनर्विचार करायला हवा. मराठा समाजाचा विचार कोणताही पक्ष करीत नाही, त्याप्रमाणेच मराठा समाजातील प्रस्थापितांनी विस्थापित मराठा तयार केले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)...तर घटनेत बदल कराअॅट्रॉसिटी कायद्यामुळे मराठा तरुणांवर अन्याय होत आहे. अनेकांवर खोट्या केसेस असून त्यात बदल झाला पाहिजे. ज्या काळात हा कायदा झाला त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. काळानुरूप समाज बदलत असल्याने काद्यातही बदल होणे अपेक्षित आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ शकत नसतील तर घटनेतील तरतुदीत बदल करा, असेही ते म्हणाले. आरोपीस गोळ्या घालाकोपर्डी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी भर चौकात जनतेसमोर फाशी दिली पाहिजे किंवा त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे सांगून सरकारला हे जमणार नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या, बघा आम्ही काय करतो, असेही उदयनराजे म्हणाले.