शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 5:47 PM

बुलढाणाच्या सभेत राऊतांनी मोदी नको, औरंगजेब म्हणा असं विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर प्रत्युत्तर दिले. 

मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नव्या उंचीवर नेले. बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते त्यांनी पूर्ण केले. अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे हा देशाचा अपमान आहे. हा देशद्रोह आहे. खरेतर औरंगजेबी वृत्ती, ज्याने बापाला सोडलं नाही, भावाला सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही. हीच वृत्ती या लोकांनी दाखवली ती महाराष्ट्राने पाहिली. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून देईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल. कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात कलम ३७० हटवले. जे स्वप्नवत वाटत होते. शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला यांना आवडत होते. म्हणून शेपटीवर जास्त प्रेम आहे. वेळेप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत लोटांगण घालणारे आणि नोटीस आली म्हणून घाम फुटणारे हे कोण आहेत? खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी कोणी शेपूट घातली हे जनतेला माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. यापुढेही चर्चा होईल. योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल. समविचारी पक्षांची युती आणि सरकारच्या कामावर विश्वास ठेवून अनेकजण आमच्यासोबत येतायेत. लोकसभा निवडणुकीसाठी आजची बैठक महत्त्वाची होती. राज्यात ४८ जागा आहेत. त्यात ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना ताकद द्यायची आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. योग्य वेळी निर्णय होईल. महाविकास आघाडी सगळा तिढा आहे. कुणीही कुणासोबत नाही. शिवाजी पार्कवर सभा झाली तिथून बाळासाहेब ठाकरे देशाला मार्गदर्शन करायचे तिथे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आणलं तोच काळा दिवस होता. इंडिया आघाडी बिखरली आहे. उद्धव ठाकरेंना घरी बसण्याची सवय आहे. त्यामुळे जनता त्यांना घरीच बसवेल असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४