शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
4
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
5
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
6
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
7
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
8
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
9
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
10
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
11
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
12
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
13
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
14
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
15
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
16
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
17
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
18
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
19
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
20
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार

"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:48 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amit Shah on Uddhav Thackeray: शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले, असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह योग्यच बोलले असल्याचे म्हटलं आहे.

शिर्डी येथील भाषणात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं, अशी टीका अमित शाह यांनी केली. यानंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज करुन बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचे राऊत यांनी म्हटलं.

"उद्धव ठाकरेंनी  दगाफटका केलेला नाही. भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह हे योग्य बोलले असल्याचे म्हटलं.

"अमित शाह असं म्हणाले की फोडाफोडीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये १९७८ पासून सुरू होतं. मधल्या काळात २०१९ मध्ये फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्याशी दगा फटका केला आणि तो महाराष्ट्राला सहन झाला नाही.  म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा २०२४ चे सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं. आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठे बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने का दिल याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीने ज्याप्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार विकसित करण्यासाठी महाराष्ट्रासाठी जनतेने आम्हाला साथ दिली," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

"अमित शाह यांच्या कालच्या भाषणात एक दिशा होती. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित शाह बोलले ते योग्यच बोलले आहेतय त्यांनी तसं केलं म्हणून अमित शहा यांनी तसे शब्द वापरले आहेत," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊतChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे