शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

केईएममधील चेंजिंग रुममध्ये कॅमेरा

By admin | Published: August 23, 2016 6:13 AM

केईएम रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरच्या चेंजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने छुपा कॅमेरा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरच्या चेंजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने छुपा कॅमेरा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यावर तत्काळ त्या कर्मचाऱ्याला (सर्व्हंट) निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ला दिली. केईएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्याचबरोबर शेकडो शस्त्रक्रिया होत असतात. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टर कपडे बदलून विशिष्ट प्रकारचे कपडे घालूनच आॅपरेशन थिएटरमध्ये जातात. यासाठी पुरुष आणि महिला डॉक्टरांना थिएटर जवळ कपडे बदलण्यासाठी एक खोली असते. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या चेंजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने मोबाईल लपवून ठेवल्याची घटना निवासी डॉक्टरांकडून शुक्रवारी उघडकीस आली आहे. या चेंजिंग रुममध्ये पुठ्ठ्याच्या खोक्यात रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मोबाईल लपवून ठेवला होता. या मोबाईलचा कॅमेरा सुरु ठेवून व्हिडिओ मोडवर ठेवण्यात आला होता. आॅपरेशन थिटएटरमध्ये जाण्याची घाई महिला डॉक्टरांना असल्यामुळे पहिल्यांदा हा प्रकार लक्षात आला नाही. पण, त्यानंतर एका महिला डॉक्टरला हा प्रकार लक्षात आल्यावर तिने मोबाईल ताब्यात घेतला. त्यावेळी या मोबाईलमध्ये व्हिडिओचे चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ या विषयीची माहिती रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांना आणि रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. सुरक्षा कार्यालयात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातही या कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या मोबाईलमध्ये काही व्हिडिओचे चित्रीकरण झाल्याचे उघड झाल्यामुळे महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या निषेधार्थ केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी कॅण्डल मार्च काढला होता. (प्रतिनिधी)>कर्मचारी निलंबितआॅपरेशन थिएटरच्या चेजिंग रुममध्ये एका कर्मचाऱ्याने मोबाईल ठेवल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. यानंतर तत्काळ त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयातर्फे अंतर्गत चौकशी समिती बसवण्यात आली आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई ठरवण्यात येईल. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. - डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय