मुंबई : वरळी नाका येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा फ्लॅटचे वीज, पाणी, गॅस कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा अहवाल मुंबई महापालिकेमार्फत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात येणार आह़े या अहवालातून कारवाईचा पुढील आराखडाही न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आह़े
कॅम्पा कोला कम्पाउंडमधील सात इमारतींमधील 35 मजले बेकायदा आहेत़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 जून रोजी येथील बेकायदा मजल्यांवर कारवाई करण्यात आली़ सलग तीन दिवस रहिवाशांनी ही कारवाई रोखून धरली होती़ मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेत रहिवाशांनी पालिका अधिका:यांसाठी कम्पाउंडचे प्रवेशद्वार उघडले होत़े
99 फ्लॅट्सचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडल्यानंतर या कारवाईचा अहवाल उपायुक्त आनंद वागराळकर व सहायक आयुक्त केशव उबाळे यांनी प्रशासनाकडे सादर केला आह़े हा अहवाल पालिकेच्या अधिका:यांमार्फत सर्वोच्च न्यायालयापुढे सोमवारी सादर केला जाणार आह़े मात्र या अहवालात काय याबाबत तूर्तास गुप्तता पाळण्यात येत आह़े (प्रतिनिधी)