शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
2
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
3
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
4
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
6
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
7
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?
8
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
9
आदिवासी महिलेने मोदींना का पाठवले १०० रुपये?; पंतप्रधानांनीच सांगितलं कारण, म्हणाले...
10
निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा
11
Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत
12
Supriya Sule : "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार
14
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
15
IND vs NZ : "आम्ही प्रयत्न केला पण...", लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची रोखठोक उत्तरं
16
RSS च्या कार्यक्रमात बाप-लेकाचा चाकू हल्ला, 10 जण जखमी; आरोपीच्या घरावर बुलडोझर...
17
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
18
'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'
19
WTC Points Table : टॉपर टीम इंडियाला मोठा धक्का; फायनलचा मार्ग खडतर होण्याची भीती
20
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

लाचखोरांविरुद्धची मोहीम तीव्र

By admin | Published: November 10, 2014 4:29 AM

पद व अधिकाराचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करणारे सरकारी अधिकारी, लोकसेवक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एलसीबी) धडक

जमीर काझी, मुंबईपद व अधिकाराचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करणारे सरकारी अधिकारी, लोकसेवक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एलसीबी) धडक कारवाईमुळे पाचावर बसली अताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विविध विभागांतील या लाचखोरांविरुद्धच्या खटल्यांत त्यांच्या विभागप्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविली जाणार आहे. त्यामुळे सुनावणी अभावी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले त्वरित निकाली निघणार आहेत.सक्षम अधिकाऱ्यांच्या कोर्टातील अनुपस्थितीचा फायदा लाचखोरांना अप्रत्यक्षपणे मिळत असल्याने शासनाने ‘व्हीसी’द्वारे दिलेली साक्ष ग्राह्य ठरविली आहे. एसीबीचे राज्याचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबतचा प्रस्ताव बनवून मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. राज्यात गेल्या ११ महिन्यांत तब्बल १०३८ लाचखोरीचे सापळे रचलेले आहेत. एसीबीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. आता त्यांच्याविरुद्धचे खटले त्वरित पूर्ण होण्यासाठी संबंधित आरोपीच्या विभागप्रमुखाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष घेतली जाणार असल्याने प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे.राज्य शासनाच्या सेवेत असलेला लोकसेवक म्हणजेच एखाद्या विभागाचा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध कायद्यातील कलम १९ व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७ अन्वये खटला दाखल करण्यासाठी त्याच्या विभागप्रमुखाची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुनावणीदरम्यान त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविला जातो. विविध विभागांत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय सक्षम अधिकारी म्हणून संबंधित विभागाचे सचिव किंवा अवर / उपसचिवाकडे जबाबदारी असते. राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांत खटले चालू असल्याने त्यांना त्या ठिकाणी साक्षीसाठी जाणे भाग असते. मात्र हे वरिष्ठ अधिकारी शासनाच्या अतिमहत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याने त्यांना कामामुळे कोर्टात साक्षीसाठी जाणे शक्य होत नाही, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू राहून खटले प्रलंबित राहतात. त्याचा अप्रत्यक्ष फायदा लाचखोर आरोपीला होऊन तो सेवेत कार्यरत राहतो किंवा निलंबित असूनही घरबसल्या कसल्याही कामाविना पगार घेत असतो.