शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

९० वर्षांचे भाडेकरार रद्द करा

By admin | Published: January 07, 2016 1:17 AM

बाजार समितीला आदेश : ‘शाहू सांस्कृतिक’बाबत निर्णय घ्या - अरुण काकडे

कोल्हापूर : ‘शाहू सांस्कृतिक मंदिर’ सोबत झालेला करार रद्द करण्यासाठी मिळणारे उत्पन्न पाहून निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बाजार समितीला बुधवारी दिले. तसेच बाजार समितीने ९० वर्षे मुदतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या प्लॉटचे करार रद्द करून भाडेपट्टीची मुदत तीस वर्षे करण्याचे आदेश त्यांनी दिले. समितीच्या माजी संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बाजार समितीमध्ये साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. ‘शाहू सांस्कृतिक’चा करार मोडला, तर ३५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे, पण ‘शाहू सांस्कृतिक’चा वर्षाला केवळ एक लाख रुपये भाडे व दर तीन वर्षांनी त्यामध्ये १५ टक्के वाढ, असा करार झाला आहे. त्यामुळे सध्या १ लाख ६० हजार भाडे मिळते, पण पंचरत्न कंपनी वर्षाला ५० लाख कमावते. हा करार मोडला तर ३५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे, उत्पन्न पाहून याबाबत निर्णय घेण्याचे आदेशही जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याबाबत दोन महिन्यांत कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे. गत दहा वर्षांत समितीमध्ये बेकायदेशीर प्लॉट वाटप झालेले आहे. ९० वर्षे इतक्या दीर्घमुदतीने प्लॉटचे करार झाले आहेत, पण पणन कायद्यानुसार तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भाडेकरार करता येत नाही. कायद्यानुसार संबंधित प्लॉटचे करार रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले. समितीतील बोळ, रस्त्यांवर बेकायदेशीर प्लॉट पाडून त्याचे वाटप केले आहे, ते रद्द करावेत, असेही आदेश दिले आहेत. कुलकर्णींची वसुली करासमितीचे कनिष्ठ अभियंता यांच्यावर केलेली जबाबदारी निश्चितीची वसुली तातडीने करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला दिले आहेत. प्रशासनाने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.