ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - "कॅन्सरला कॅन्सल करा" हे ब्रीद वाक्य घेऊन "लोकमत" आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने "एक जीवन स्वस्त जीवन" हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांव्दारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. त्यापैकी कोल्हापूरात 21 एप्रिल रोजी तज्ञ डॉक्टरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
या परिसंवादात डॉक्टर्स, फिजिशिअन्स, वैद्यकीय काउन्सलर्स, समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कर्करोगावर मात करुन नवीन आयुष्य सुरु करणारे अनेकजण या वेळी त्यांचे अनुभव उपस्थितांना सांगणार आहेत.
कर्करोगाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तसेच याबाबत स्वत:चे किंवा कुटुंबियांचे अनुभव कथन करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असा आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमाव्दारे पथनाटय, परिसंवाद, डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथून झाली असून, नागपुरात त्याची सांगता होणार आहे.
"लोकमत" आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून पथनाटय, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांव्दारे राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी 9322144444 या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग ऑन करा www.ekjeevanswasthjeevan.in
कर्करोगाचा विळखा
देशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे 10 लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. सन 2035 पर्यंत ही आकडेवारी 17 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिस-या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्याप्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरुकता असणे महत्वाचे ठरते.
परिसंवादातील मान्यवर
प्रमुख पाहुणे - डॉ. कुणाल खेमणार, सीईओ जिल्हा परिषद कोल्हापूर
सहभागी तज्ञ डॉक्टर्स - कोकिलाबेन रुग्णालयाचे प्रख्यात सर्जन डॉ.मनोज मूलचंदानी (सर्जिकल ऑन्कॉलॉजी)
डॉ. समीर तुळपुळे (जनरल हाइमॅटॉलॉजी)
पॅनलवरील डॉक्टर्स - डॉ. रवींद्र शिंदे ( अध्यक्ष आयएमए कोल्हापूर), डॉ. अरुण परिटेकर (आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जि.प.) आणि डॉ. दीपक देवळापुरकर (जनस्वास्थय दक्षता समिती, कोल्हापूर)
नोंदणीसाठी संपर्क करा
कोल्हापूर - सचिन - 9767264885
नाशिक - जया - 9850304132
नागपूर- प्रमोद - 9881748790