शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सेवाशुल्क रद्द केल्याने खाद्यपदार्थ महागणार

By admin | Published: January 05, 2017 5:29 AM

हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या-इतर सेवांच्या दरांवर, दर्जावर कोणतेही नियंत्रण नसताना सेवाशुल्क माफीतून सरकार नेमके काय साधणार आहे

राजू ओढे, ठाणेहॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या-इतर सेवांच्या दरांवर, दर्जावर कोणतेही नियंत्रण नसताना सेवाशुल्क माफीतून सरकार नेमके काय साधणार आहे, असा प्रश्न ठाण्यातील ग्राहकांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला. सेवाशुल्क मुख्यत्वे तारांकित हॉटेल्समध्ये आकारले जाते. सरकारच्या निर्णयामुळे हे हॉटेलमालक सेवाशुल्क आकारण्याऐवजी तेवढ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे दर वाढवतील आणि या दरवाढीचा बोजा वेगळ््या मार्गाने ग्राहकांच्याच माथी पडेल, अशी भीतीही यातून पुढे आली.हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये आकारले जाणारे सेवाशुल्क ग्राहकांना ऐच्छिक असावे, हॉटेलची सेवा आवडली तरच सेवाशुल्क देण्याची मुभा त्यांना असावी, अशी भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली. सर्व राज्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बहुतांश हॉटेलच्या केलेल्या पाहणीत थेट सेवाशुल्काची आकारणी होत नसल्याचे सांगण्यात आले. अनेक हॉटेल, बार आणि उपाहारगृहांमध्ये सेवाकर आणि व्हॅटही वेगळे आकारले जात नाहीत. आम्ही हे सर्व खर्च गृहित धरून त्यानुसारच दर ठरवतो, असे या हॉटेल मालकांनी सांगितले. मॉलमधील उपाहारगृहे आणि तारांकित हॉटेलांत वेगवेगळी कर आकारणी केली जाते. सेवाकर, व्हॅट, शिक्षणशुल्क आणि सेवाशुल्कासह वेगवेगळ्या करांचे प्रमाण जवळपास १६ टक्क्यांवर जाते. हे प्रमाण जास्त असले तरी, अशा महागड्या हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना त्याचा फारसा फरक पडत नाही, हेही त्यांनी लक्षात आणून दिले. ठाण्यातील बहुतांश हॉटेल्समध्ये सेवाशुल्क आकारले जात नसले, तरी या हॉटेलच्या मालकांनीही सरकारच्या निर्णयावर नापसंती दर्शवली. आम्ही सेवाशुल्क आकारतच नसल्याने आम्हाला सरकारच्या निर्णयाने फरक पडणार नाही. परंतु या निर्णयातून साध्य काहीच होणार नाही, असे स्पष्ट मत या हॉटेल मालकांनी व्यक्त केले. त्याही पुढे जाऊन सरकारच्या समाधानासाठी हॉटेल मालकांनी सेवाशुल्क आकारणे बंद केले, तरी त्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करण्याचाच पर्याय त्यांच्यासमोर खुलाच राहील. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या सरकार दरवाढीलाच प्रोत्साहन देत असल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला. या निर्णयातून ग्राहक हित अजिबात साधले जाणार नाही, असे वेगवेगळ््या हॉटेलांतील ग्राहकांशी केलेल्या चर्चेतून निष्पन्न झाले. हॉटेलच्या दरपत्रकावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे हा निर्णय निरर्थक असल्याची परखड प्रतिक्रियाही ग्राहकांनी नोंदवली. पगाराशिवाय बक्षिसीसाठी सेवाशुल्क!हॉटेलचे व्यवस्थापन- आदरातिथ्याचा हा व्यवसाय प्रचंड खर्चिक बनला असून वाढत्या महागाईने, सततच्या बदलत्या धोरणांमुळे त्यात भर पडते आहे. हॉटेल मालकांचा कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च गेल्या दहा वर्षांत चारपटीने वाढला आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रत्येक कर्मचारी करीत असतात. ग्राहक स्वखुशीने देत असलेल्या टिपचा फायदा केवळ वेटरला होतो. स्वयंपाकी आणि हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय काहीच मिळत नाही. यावर उपाय म्हणूनच मोठ्या हॉटेल्समध्ये बिलाच्या रकमेवर ५ ते १0 टक्के सेवाशुल्क आकारले जाते. हे सेवाशुल्क सर्व कर्मचाऱ्यांत वाटले जाते, असे हॉटेल्स मालकांनी सांगितले.