अकाेला - अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी मागच्या निवडणूकीत काॅंग्रेसने प्रथमच आपला उमेदवार दिला हाेता त्यामुळे येत्या निवडणुकीतकरिता ही जागा काॅंग्रेस पक्षाकडूनच लढविली जाईल, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित निवडणुक लढविणार असल्याने आमचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल असा दावा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.
काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेच्या पुर्वतयारीच्या बैठकीकरिता बुधवारी ते अकाेल्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटाेले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या गठणावेळीच स्थानिक स्वराज्य संस्था वगळता इतर जागांवर या आधी ज्यांनी उमदेवार दिले हाेते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात यावे असे ठरले हाेते या सूत्रांनुसारही अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात आमचाच उमेदवार राहिल हे स्पष्ट हाेते असा दावा त्यांनी केला. यावेळी महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष अशाेक अमानकर, महानगरअध्यक्ष डाॅ.प्रशांत वानखडे, जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, धनंजय देशमुख, माजी आमदार बबनराव चाैधरी, यात्रेचे जिल्हा समन्वयक मदन भरगड, प्रकाश तायडे साजीद खान पठाण, डाॅ. सुधीर ढाेणे, डाॅ.जिशान हुसेन कपील ढाेके आदी उपस्थित हाेते.
भाजप वगळता सर्व पक्षांना यात्रेचे निमंत्रणराहूल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा ही देश जाेडणारी यात्रा आहे त्यामुळे या यात्रेला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही आमंत्रण देणार आहे मात्र ज्यांनी हा देश ताेडण्याची भूमिका घेतली त्या भाजपाला वगळून सर्वांना समर्थनाची साद घालणार असल्याचे पटाेले म्हणाले
आंबेडकरांनी काेणताही प्रस्ताव दिलेला नाहीकाॅंग्रेस व वंचित बहूजन आघाडी एकत्रितरित्या निवडणूक लढविण्याबाबतच्या चर्चा हाेत असता मात्र मी काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्याकडून अशा प्रकारचा कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. भारत जाेडाेच्या निमित्ताने ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेणार आहे त्यावेळी याबाबत स्पष्ट बाेलणे हाेईल असे ते म्हणाले
पालकमंत्री नियुक्त केले की स्पायडरमॅनराज्य सरकारने विविध जिल्हयांसाठी पालकमंत्री नियुक्त केले आहेत. एकाएका मंत्र्यांकडे सहा सहा जिल्हे देण्यात आले आहेत हा हास्यास्पद प्रकार असून सरकारने पालकमंत्री नियुक्त केले की स्पायडरमॅन असा टाेला पटाेले यांनी हाणला आहे.