उद्या निकाल : पंचरंगी लढतीमुळे कमालीची चुरस, लागल्या पैजा
पुणो : बुधवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी लागणार आहे. या वेळी प्रथमच युती आणि आघाडी तुटल्याने प्रत्येक प्रमुख पक्षांना स्वतंत्रपणो मैदानावर उतरावे लागले. मतदारांनीही विक्रमी मतदान केले. आता निकालाच्या धास्तीने उमेदवारांची झोप उडाली आहे.
रविवारी होणा:या मतमोजणीचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता उमेदवारांबरोबर तमाम मतदारांनाही आहे. कारण या वेळी कधी नव्हे तो प्रत्येक पक्षाचा ‘बेस’ (पाया) जिल्ह्यात किती भक्कम आहे, हे दिसून येणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये झाले. त्यानंतर दौंड तालुक्यातही विक्रमी मतदान झाले आहे. या दोन्ही मतदारसंघांत चुरशीची लढत अपेक्षित आहे. जिल्ह्यात काटय़ाची टक्कर ठरणा:या या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदान 68 टक्के भोरमध्ये झाले आहे. तेथेही निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. पोलिसांसह एसआरपीएफचे जवानही तैनात आहेत. खडकवासला मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर 11 ते 12 र्पयत संपूर्ण चित्रच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम संपल्यानंतर जिल्ह्यातील अनेक उमेदवार आउट ऑफ रेंज झाले आहेत. अज्ञातस्थळी ते आराम करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते. तर काही उमेदवारांनी कुठलाही ताण न घेता आपली नेहमीची कामे सुरू ठेवली आहेत. यंदा प्रथमच जिल्हाभरात पंचरंगी लढती होत आहेत, त्यामुळे निवडणुकीचा अंदाज बांधणो कठीण झाले आहे.
4पुणो : विधानसभा निवडणुकीचे मतदान होईर्पयत एकमेकांच्या राजकीय पक्षांच्या धोरणांची चिरफाड करीत एकमेकांवर टीकेची झोड उठविणा:या शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी आज वाडेश्वर कट्टय़ावर राजकीय मतभेद आणि मनभेद तसेच कटुता विसरून एकत्रित अल्पोपहाराचा आनंद लुटला.
4राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना कोपरखळ्या मारणा:या या नेत्यांनी राजकीय कटुता विसरून सरतेशेवटी आमदार म्हणून कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी, सर्वानी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत एक अनोखा आदर्श घालून दिला. मात्र, या वेळी खोटाखोटा का होईना; पण शहरात आपल्याच पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा दावा करण्यास हे राजकरणी विसरले नाहीत.
4खासदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, कट्टय़ाचे संयोजक डॉ. सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, कॉंग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष संजय बालगुडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख शाम देशपांडे, मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, माजी नगरसेवक गोपाळ चिंतल उपस्थित होते.
4मोदी लाटेचा शहरातही प्रभाव असल्याने शहरात आठही ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार शिरोळे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात कॉंग्रेसच्या जागा मोठय़ा प्रमाणात वाढतील, असा दावा बालगुडे
यांनी केला.
4एक्ङिाट पोलमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मनसेला एक जागा दाखविण्यात आली असली तरी, शहरात कोथरूड, कसबा तसेच कँन्टोन्मेंट आणि खडकवासला मतदारसंघात मनसेचा जोर अधिक होता. त्यामुळे शहरात दोन जागा तसेच जिल्ह्यातही एक जागा मिळेल असा विश्वास शेडगे यांनी व्यक्त केला.
4सेनेसाठी सर्वच मतदारसंघांत चांगले वातावरण असल्याने शिवसेनेचे आमदार शहरात वाढणार असल्याचे देशपांडे म्हणाले. रिपाइं भाजपासोबत असली तरी, वडगावशेरी मतदारसंघात रिपाइंचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ धेंडे राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांचा पराभव करतील, असा दावा कांबळे यांनी केला.