ज्योतिषीय विसंगतीची सबब देत विवाहाचे वचन तोडू शकत नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:20 AM2021-09-22T11:20:39+5:302021-09-22T11:21:29+5:30

पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Cannot break marriage vow on the grounds of astrological discrepancy says High Court | ज्योतिषीय विसंगतीची सबब देत विवाहाचे वचन तोडू शकत नाही - उच्च न्यायालय

ज्योतिषीय विसंगतीची सबब देत विवाहाचे वचन तोडू शकत नाही - उच्च न्यायालय

googlenewsNext

मुंबई : कुंडलीतील ज्योतिषीय विसंगतीचा बहाणा देऊन विवाहाचे वचन मागे घेतले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका व्यक्तीची बलात्कार व फसवणुकीच्या आरोपातून मुक्तता करण्यास नकार दिला. 

पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मित्रा याचे वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयात सांगितले की, जोतिषीय विसंगतीमुळे आरोपी व तक्रारदारमधील नाते पुढे जाऊ शकले नाही. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचे हे प्रकरण नाही. ठाकरे यांचा हा युक्तिवाद न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठाने अमान्य केला. सुरुवातीपासूनच आरोपीला पीडितेशी विवाह करायचा नव्हता, हे सुचविणारे अनेक पुरावे आहेत. जोतिषीय विसंगतीच्या सबबीखाली आरोपी महिलेशी विवाह करण्यास टाळत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

प्रथमदर्शनी, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने कारवाई टाळण्यासाठी आरोपीने विवाह करण्याचे आश्वासन दिले, असे न्यायालयाने म्हटले. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, २०१२ पासून आरोपी आणि तिची एकमेकांशी ओळख आहे. ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्र काम करत होते. विवाहाचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदरही झाली. याबाबत तिने आरोपीला माहिती दिली. मात्र, अजूनही आपण लहान आहोत आणि आपल्याला लग्न करायचे नाही, असे सांगत त्याने तिला गर्भपात करायला लावला. त्यानंतर डिसेंबर २०१२ पासून आरोपी महिलेला टाळत होता. तिने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. 

युक्तिवाद अमान्य
जानेवारी २०१३ मध्ये आरोपीने तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे महिलेने पोलीस तक्रारही मागे घेतली. तक्रार मागे घेतल्यावर आरोपीने जोतिषीय विसंगतीचे कारण देत विवाहास नकार दिला. त्यामुळे महिलेने पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायालयाने मित्रा याचा युक्तिवाद अमान्य करत केला.
 

Web Title: Cannot break marriage vow on the grounds of astrological discrepancy says High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.