राष्ट्रीय उद्योग कॉरिडॉर प्राधिकरणाचे मुख्यालय होणार असल्याने येत्या काही वर्षात पुण्याची वाटचाल देशाची उद्योग-सेवा क्षेत्रची राजधानी होण्याकडे सुरू झाली असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र, या बदलाला सामोरे जाण्यासाठी शहर अधिक सक्षम बनविणो गरजेचे असून, अंतर्गत रस्ते, वेगवान वाहतूक, विमानतळ, मेट्रो अशा सुविधांबरोबरच गृहसंकुलांचादेखील शिस्तबद्ध विकास करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रतील धुरिणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पुणो शहरात जरी कॉरिडॉर नसला, तरी या कॉरिडॉरचे मुख्यालय शहरात होणार असल्याने त्याचे फायदे शहराला होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक अनंत सरदेशमुख यांच्याशी खास बातचित केली. शहरात मुख्यालय होणार असल्याने शहरातील उद्योगांना विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत संपर्क साधणो सोपे जाणार आहे. मुंबई-बेंगलोर हा कॉरिडॉर पुणो शहरालगत होत आहे. त्यामुळे अगदी शिरवळ, कोल्हापूर, सातारा परिसरातील उद्योगवाढीलादेखील चालना मिळणार आहे. शहरातील मॅन्युफॅक्चरिंग, अॅटोमोबिल, जनरल इंजिनिअरिंग कंपन्यांना सर्वाधिक फायदा होईल. तसेच, पूरक नवीन उद्योगधंदेदेखील वाढतील. उद्योगधंद्यामुळे सेवा क्षेत्रशी निगडित उद्योगांनादेखील चांगली मागणी वाढेल. गृहसंकुल, मार्केट, रुग्णालये, वाहनसेवा तितक्या प्रमाणात वाढवावी लागेल. त्यामुळे रोजगाराच्या संधीत वाढ होईल, असे सरदेशमुख यांनी सांगितले. उद्योग इंडस्ट्रीसाठी अंतर्गत रस्ते, रेल्वे व वाहनतळाशी जोडणारी वेगवान वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. याशिवाय उद्योगांमुळे वाढणा:या लोकसंख्येला सामावून घेऊ शकरणारी पायाभूत सुविधा उभारावी, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.