नागपूर : ‘आपण कोणतीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजपात आलो. त्यामुळे पक्षाला सावध करण्यासाठी मी वेळोवेळी खरे बोललो,’ असे अभिनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. ‘ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को’चा पुनरुच्चार करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांवर नेम साधला.ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात रविवारी खा. शत्रुघ्न सिन्हा सहभागी झाले. ‘मी बिहारीबाबू असूनही काही नेत्यांनी मला समोर येऊ न देण्याचा चंग बांधला. हे बिहारी जनतेला पटले नाही. दिल्लीत कांद्याने काढलेले अश्रू भाजपाने अनुभवले आहेत. त्यामुळे डाळींची दरवाढ रोखण्याचे मत मी मांडले, तर काय चुकीचे बोललो,’ असा सवाल त्यांनी केला.
ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को!
By admin | Published: November 16, 2015 3:33 AM