शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:20 PM

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआंबेनळी घाटात कार दरीत कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातमहाबळेश्वर पोलीस व ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी दाखल

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत राजेंद्र सोसटे (भोसरी, पुणे) हा शनिवारी सकाळी कारने (एमएच १४ एफजी ००७७) पोलादपूरहून महाबळेश्वरकडे निघाला होता. पोलादपूर हद्दीत आंबेनळी घाटातील बावली टोकाजवळ त्याचा कारवरून ताबा सुटला. यानंतर कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. अपघातवेळी प्रशांत सोसटे कारमधून बाहेर फेकला गेला व दरीतील एका झाडावर अडकून पडला.पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाच्या ही घटना निदर्शनास येताच त्याने तातडीने प्रतापगड व वाडा कुंभरोशी येथील नागरिकांना अपघाताची माहिती दिली. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक प्रशांत सोसटे याला दरीतील झाडावरून बाहेर काढले.

वाडा कुंभरोशी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान