शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुलाला कार धडकल्याने चौघे ठार

By admin | Published: August 04, 2016 4:22 AM

भरधाव वेगातील मोटार पुलाच्या खांबाला धडकून पुण्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

लोणावळा (जि. पुणे) : भरधाव वेगातील मोटार पुलाच्या खांबाला धडकून पुण्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मळवली गावाजवळील देवले पुलाजवळ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता झाला. ओंकार प्रवीण मंचरकर (वय २३, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे), राजवीरसिंग योगेंद्रसिंग ठाकूर (वय २७, रा. पाषाण, पुणे), अजिंक्य कारखानीस (वय २४) व कुणाल संजय निगुडकर (वय २४, दोघेही रा. सांगवी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. चालक इम्रान युनूस शेख (रा. कोंढवा, पुणे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्त मोटार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. देवले पुलाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटार पुलाच्या खांबाला धडकून अपघात झाला. मोटारीचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. (वार्ताहर)>पंधरा दिवसांत ३ अपघातांत १३ ठार द्रुतगती महामार्गावर गेल्या पंधरा दिवसांत कामशेत ते मळवलीदरम्यान तीन अपघात होऊन १३ जण मृत्युमुखी पडले. वाढते अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.