घोडेगाव (जि. पुणो) : डाेंगराचा कडा कोसळून जवळजवळ पूर्णपणो गाडल्या गेलेल्या माळीण गावातील ढिगा:यांखालून शनिवारी आणखी 1क् मृतदेह मिळाल्याने मृतांची संख्या 82 वर गेली आह़े दरम्यान, पाणी तसेच गाळाबरोबर काही लोक वाहून गेल्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने शनिवारी नदीपात्रमध्येही शोध सुरू केला आहे.
चौथ्या दिवशी सात पोकलेन मशीन व एक बुलडोझरच्या साहाय्याने उत्खननाचे काम सुरू होते. आत्तार्पयत फक्त 4क् टक्के काम पूर्ण झाले आह़े अजूनही चार ते पाच दिवस हे काम चालणार असल्याचे समजत़े दरम्यान, वन व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर.आर. पाटील, आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. माळीणमध्ये गाडल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईक घटनास्थळी जमले होते आणि काम सुरू असलेल्या ठिकाणी थांबून आप्तजनांचे मृतदेह सापडतात का हे पाहत होते. माळीणमध्ये कोणताही आजार पसरू नये, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष दिले. सर्वत्र टीसीएल पावडर फवारण्यात आली. माळीणमध्ये काम करणा:या सर्व कर्मचा:यांना मास्क व हँडग्लोव्हज् देण्यात आले होते. (प्रतिनिधी)