धनकवडी : शुक्रवारी (दि. २६) दुपारी बाराच्या सुमारास कात्रज ते चिंचवडगाव या गाडीच्या चालक-वाहकांना बस न थांबविल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून व धमकी देण्याचा प्रकार व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने कात्रज डेपोतील चालक-वाहकांनी गाड्यांचा चक्का जाम, काम बंद आंदोलन केले.कात्रज स्थानकातून कात्रज ते चिंंचवडगाव ही ट्रॅव्हल टाइम या भाडेतत्त्वावर चालणारी ठेकेदार कपंनीची गाडी बाहेर पडतानाच्या उतारावरच असतानाच महिला प्रवाशाने हात केला. मात्र, या ठिकाणी सिग्नलवरून गाडी पुढे जात असल्याने चालक अनिल अवाडे व वाहक योगेश काकडे यांनी बस थांबवली नाही. मात्र, कात्रजच्या मुख्य चौकातील सिग्नलवर गाडी थांबल्याचे पाहिल्यावर संबंधित महिलेने गाडीच्या पुढे जावून गाडी अडवली व चालक आणि वाहक यांना शिवीगाळ केली. ‘गाडी का थांबवली नाही?’ याच जाब विचारून गाडी कात्रज पोलीस चौकीत घेऊन जाण्यास सांगितले.चालक व वाहक यांना अशा प्रकारे कायमच मारहाण होण्याच्या घटना घडत असल्याने सर्व चालक-वाहकांनी या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी करून व ही बाब कंपनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने बंद पाळण्यात आला. यात काही काळ पीएमपीएमएल कामगार संघटनेचे (इंटक) पदाधिकारी तसेच चालक-वाहक व कर्मचारी आणि २००च्या वर गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे काही काळ प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.।सहकार्याची अपेक्षाचालक अनिल अवाडे, वाहक योगेश काकडे यांनी सांगितले, की अशा प्रकारानंतर पोलीस किंवा कंपनीकडून कोणतीही मदत मिळत नाही. उलट, छोट्या-मोठ्या बाबींवरून दंडापोटी पगारातून पैसे कट केले जातात. तक्रार नोंदवून घेण्यासदेखील टाळाटाळ केली जाते. संपूर्ण संरक्षण मिळालेच पाहिजे. सध्या कात्रज पोलीस चौकीत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
वाहक-चालकांचा चक्का जाम
By admin | Published: August 27, 2016 1:18 AM