ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 03 - लाच घेतल्याच्या आरोपावरुन आयकर विभागातील अपील आयुक्तांसह सहा जणांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आयकर विभागातील अपील आयुक्त बी. बी. राजेंद्र प्रसाद यांच्यासह आणखी पाच जणांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी (दि.03) रात्री अटक केली.
दिल्ली आणि विशाखापट्टणम सीबीआयच्या टीमने मुंबई सीबीआय अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. एस्सार स्टील्स कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप बी व्ही राजेंद्र प्रसाद यांच्यावर आहे. त्यांनी एस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॅपिटिव्ह पॉवर प्लांटच्या बालाजी ट्रस्टला आयकरमध्ये सूट देऊन गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितली होती.
दरम्यान, या लाचप्रकरणात सामील असलेल्या चौघांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे, तर आणखी दोघांना विशाखापटणम येथून अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून बी. बी. राजेंद्र प्रसाद यांच्या बेकादेशीर कामांमध्ये सहभाग असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी सीबीआयने सविस्तर माहिती अद्याप उघड केली नाही.
#FLASH: CBI arrests Commissioner of Income-tax (Appeals) BB Rajendra Prasad, along with five others. More than 1.5 crore seized pic.twitter.com/hi7XFL8bHP— ANI (@ANI_news) May 3, 2017