शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

वक्फ जमीन घोटाळ्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 7:36 AM

जालना जिल्ह्यात झाली जमिनीची खरेदी-विक्री अन् बांधकामही

मुंबई : जालना जिल्ह्यातील परतूर नगर परिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी तसेच काही जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी जालना जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मशिदीच्या नावे परतूर नगर परिषद हद्दीत ६.४९ हेक्टर आणि १.८७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळाच्या जमिनी आहेत. या जमिनींचा वापर मशिदीच्या सेवेसाठी तसेच दैनंदिन खर्चासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून करण्यात येतो. ही मशीद वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असल्याने त्याच्याकडील कोणत्याही मालमत्तेची विना परवानगी खरेदी-विक्री, गहाण, दान, बक्षीस इत्यादी होऊ शकत नाही. तथापि, जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी (सर्व रा. परतूर) यांनी संगनमत करून या इनामी जमिनीची बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री करून गैरव्यवहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी, दत्ता शंकर पवार, शेख अब्दुल सत्तार शेख रज्जाक, लुकमान कुरेशी नादान कुरेशी, हुसेन यासीन शेख, अजहर शेख युनुस शेख, मोहम्मद शरीफ अब्दुल हमीद कुरेशी (सर्व रा. परतूर, जि. जालना) या ९ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी ही माहिती दिली. वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री.