शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुण्यात खटला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:31 IST

स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती दिली असल्याचा ठपका ठेवला आहे.

पुणे : अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात मंगळवारी खटला दाखल करण्यात आला आहे.मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अ‍ॅड़. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत मंगळवारी खटला दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी़. एस़. गायकवाड यांच्या न्यायालयात हा फौजदारी खटला दाखल केला असून त्यावर लवकर न्यायालयात आदेश देण्याची शक्यता आहे़. 

 भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी यंदा निवडणूक लढविताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती दिली आहे. यापूर्वीच्या 2014 निवडणूकीत देखील त्यांनी चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल केली होती. याप्रकरणी बी. एस.गायकवाड यांच्या कोर्टात इराणी यांच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला आहे.  इराणी या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. इराणी यांनी 2004 साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या विरोधात दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. अ‍ॅड. रुपाली पाटील यांनी इराणी यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.  फिर्यादीकडून अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील हे काम पाहत आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले, गेल्या काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती लपविल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर त्यांनी निवडणूकीमध्ये फायदा मिळविण्याच्या उद्देशाने 2004 मध्ये बी ए ची पदवी 1996 मध्ये पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले.  फिर्यादी यांनी संकेतस्थळावर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यावर इराणी यांनी बीए पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. याबरोबरच पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले. या फसवणूकीची लेखी तक्रार देऊन देखील   खडक पोलीस स्टेशन याठिकाणी फिर्यादी यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे अर्जात नमुद करण्यात आले आहे.  दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती देत स्मृती इराणी यांनी मतदार यांची फसवणूक केली आहे. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण खडक पोलीस स्टेशन यांच्याकडे तपासाकरिता पाठविण्यात यावे, तसेच हा खटला गुणदोषावर चालवून आरोपीला कडक शासन करण्यात यावे. असा विनंती अर्ज कोर्टाला सादर करण्यात आल्याचे अ‍ॅड. ठोंबरे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी