ठाणे : जिल्ह्यातील खाडी किनारच्या सुमारे एक हजार ६०० हेक्टरवरील कांदळवनापैकी बहुतांश ठिकाणच्या कांदळवनाचा नाश रेतीमाफियांसह बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांनी केला आहे. या वनाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आदेशानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रातदेखील वनसंवर्धन घोषीत केले होते. यानुसार कांदळवन नष्ट करणाऱ्या सुमारे ६० जणांवर गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. याशिवाय कांदळवनाचा नाश करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांविरु द्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.नवी मुंबई तसेच भिवंडी, ठाणे तालुक्यातील कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला प्राधान्य देऊन कांदळवनावरील अतिक्र मण किंवा त्याचा नाश करण्यात येत असलेल्या तक्र ारींची तातडीने दाखल घेऊन संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. याशिवाय कांदळवनाच्या जागांवर कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू नये, अशाही सूचना जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी नुकतीच प्रांताधिकारी व तहसीलदारांची बैठक घेतली आहे. गुन्हे दाखल केलेल्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाऱ्यांचा समावेश आहे. भिवंडी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. वन संरक्षित (अधिसूचित) करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्त क्षेत्र सुमारे १४७१ हेक्टर असून ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढण्याची कार्यवाही सुरु आहे.(प्रतिनिधी)>कांदळवनाचा ऱ्हास थांबवण्यासाठी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. या ठिकाणच्या खारफुटीच्या संरक्षणाची जाणीव त्याना वेळीच झाली असती तर शेकडो एकरमधील कांदळवनाचा बचाव करता आला असता. पण ती आमची जबाबदारी नसून वनविभाग, समाजिक वनीकरण तर कधी मेरी टाईम बोर्डची जबाबदारी असल्याचे उत्तर तेव्हा मिळाले होते. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
कांदळवन नष्ट करणाऱ्या ६० जणांविरूद्ध अखेर गुन्हे दाखल
By admin | Published: November 04, 2016 5:09 AM