शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

बनावट नोटा प्रकरणातील नागरेसह चौघा संशयितांच्या कोठडीत वाढ

By admin | Published: January 02, 2017 8:00 PM

बनावट नोटा छपाई प्रकरणातील फरार संशयित रविवारी रात्री पोलिसांना शरण आल्याने या गुन्ह्यातील संशयितांची संख्या १२ झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २ - १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणातील फरार संशयित रविवारी रात्री पोलिसांना शरण आल्याने या गुन्ह्यातील संशयितांची संख्या १२ झाली आहे. यातील ११ संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी़व्ही़देढिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल यांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर उर्वरित आठही संशयितांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.पुणे प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी सापळा रचून २२ डिसेंबरला मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कार अडवून ११ संशयितांकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा तर १८० लाख रुपयांची जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या होत्या. तपासात पोलिसांनी संशयित नागरे याच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्युटीपार्लरमधूनर बनावट नोटा छापण्यासाठीचे प्रिंटर, स्कॅनर, कटर मशिन, शाई, कागद जप्त करण्यात आले. तसेच बँकेतील सुमारे ५८ लाखांची रक्कम शोधून काढली. पोलिसांनी अटक केलेल्या 11 संशयितांना न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामध्ये नागरे व पाटील हे नोटा छपाईतील प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले, तसेच आणखी ८० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याच्या त्या तयारीत होते. या प्रकरणातील 12वा संशयित कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा. रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर) हा फरार होता मात्र तो पोलिसांना शरण आला़ त्याने आणखी एका संशयिताचे नाव सांगितले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत़सरकारी पक्षाचा युक्तिवाद सरकारी वकील सुनीता चिताळकर व पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी संशयित तपासात सहकार्य करीत नाहीत़ बनावट नोटांसाठीचा कागद, कटर मशिनची खरेदी तसेच संगणकाचा सीपीयु जप्त करणे बाकी असून आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोधासाठी चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़ तसेच या गुन्ह्यातील सस्ते, नागरे,पाटील व अग्रवाल यांच्याकडून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे सांगितले़बचाव पक्षाचा युक्तिवादअ‍ॅड़राहुल कासलीवाल व अ‍ॅड़एम़वायक़ाळे यांनी न्यायालयात संशयितांतर्फे युक्तीवादात करताना सांगितले की, संशयितांना बारा दिवसांची पोलीस कोठडी देऊनही त्याचा तपास बाकी आहे़ पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे, तर संशयित पांगारकर हे केवळ प्रवासी म्हणून बसलेले होते़ अग्रवालकडे असलेला संगणकाचा सीपीयू व हार्ड डीस्कही पोलिसांकडे आणून देतो त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मागणी केली़या संशयितांच्या कोठडीत वाढसंदीप संपतराव सस्ते (४५, रा़ ६९९,/२, झांबरे इस्टेट, प्लॉट नंबर ६, मुकुंदनगर, पुणे), छबू दगडू नागरे(४२, रा़प्लॉट नंबर १८, माहेरघर मंगल कार्यालयाशेजारी, खुटवडनगर, नाशिक), रामराव तुकाराम पाटील - चौधरी (५५, रा़शांताई बंगला, महात्मानगर, नाशिक), कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा़ रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर)या संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगीरमेश गणपत पांगारकर (६३, रा़पांगरी, ता़सिन्नर, जि़नाशिक) , संतोष भिवा गायकवाड (४३, दिंडोरी रोड, म्हसरूळ) , डॉ़ प्रभाकर केवल घरटे(४४, रा फ्लॅट नंबर ९, बालाजी पार्क, सावरकर नगर, गंगापूररोड, नाशिक), ईश्वर मोहनभाई परमार (५०, युनिक कोरम बिल्डिंग, बी विंग, ६०६, मीरा भार्इंदर रोड, मुंबई), नीलेश सतिश लायसे (२७, रूम नंबर ६, राऊत चाळ, मोरवा गाव, उत्तमरोड, भांर्इंदर वेस्ट, मुंबई), गौतम चंद्रकांत जाधव (२८, रा. ७०३, हायटेक सोसायटी, सेक्टर १२, खारघर, नवी मुंबई), प्रवीण संजय मांढरे (३१, रा़बिल्डिंग नंबर १५, संघर्ष सोसायटी, चांदीवली, अंधेरी ईस्ट, मुंबई), राकेश सरोज कारखूर (२९, रा़महात्मा फुले नगर, चव्हाण टॉवर, रुम नंबर १०३, ठाणे)