मुंबई : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शासनाने ५ फेब्रुवारी २०१६च्या निर्णयान्वये शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१५पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांहून ११९ टक्के केला होता. तसेच १ फेब्रुवारी २०१६पासून महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली होती. आता शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीतील थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे, त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. हे आदेश सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.
महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने
By admin | Published: April 23, 2016 4:23 AM