शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

एटीएममध्ये रोकड टंचाई

By admin | Published: April 06, 2017 6:16 AM

नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे.

मुंबई : नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे. तीन-चार एटीएममध्ये जाऊनही रोख रक्कम मिळत नसल्याने लोकांचे हाल होत असून सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. लोकांना ‘कॅशलेस’ व्यवहारास भाग पाडण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नोटांचा पुरवठा होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी केला आहे.उटगी म्हणाले की, नोटबंदीनंतर काही एटीएममधील ‘कॅश रिकॅलिब्रेशन सिस्टम’मध्ये बदल करण्यात आला. मात्र अद्याप बहुतेक एटीएममध्ये नव्या २ हजार आणि पाचशे रुपये किंमतीच्या नोटांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे मोजकेच एटीएम सुरू आहेत. त्यात ‘आरबीआय’कडून पुरेसा नोटांचा पुरवठा होत नसल्याने नोटाबंदीनंतर सुरू केलेले एटीएमही बंद होत आहेत. ‘आरबीआय’ने रोखून ठेवलेल्या नोटांमुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना कॅशलेसकडे नेण्यासाठी ‘आरबीआय’ आणि सरकारकडून जाणीवपूर्वक नोटांची टंचाई निर्माण होत असल्याचा गंभीर आरोपही उटगी यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचा कॅशलेसवर अद्याप पूर्ण विश्वास नाही. तरीही लोकांना जबरदस्तीने कॅशलेस व्यवहारांना भाग पाडण्यासाठी सरकार नोटांची टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही उटगी यांनी केला आहे.तर ‘आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’चे सहसचिव देविदास तुळजापूरकर म्हणाले की, राज्यात शेतीच्या कामांसह लग्नसराईचा जोर आहे. त्यात सरकारने बँक आणि एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांच्या मर्यादेवरील सर्व बंधने उठवली आहेत. परिणामी, एटीएमवर अधिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्याभरात आलेल्या सुट्ट्यांमुळे बँक अधिक वेळ बंदच होत्या. त्यामुळे नोटांची टंचाई झाली आणि एटीएममध्ये कमी रोख रक्कम भरल्याने आता टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एटीएममधील नोटटंचाईच्या निषेधार्थ विदर्भात काही ठिकाणी शिवसैनिकांनी एटीएमची आरती करत आंदोलनही केले. (प्रतिनिधी)>बँकांना दंड लावा!एटीएम वापरावरील निर्बंधासाठी आरबीआयने काही राष्ट्रीयीकृत बँकांना ठराविक वापरानंतर ग्राहकांकडून दंड वसुलीस परवानगी दिली होती. मात्र आता गरजेच्या वेळी बँक एटीएम सेवा पुरवण्यात असमर्थ ठरत असल्याने बँकांनाही दंड लावण्याची मागणी तुळजापूरकर यांनी केली आहे.