मुंबई : नोटाबंदीमुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वर्षाखेरीच्या सेलिब्रेशनसाठी सामान्यांनी मात्र, ‘आॅनलाइन’चा मार्ग पत्करला आहे. नुकत्याच एका सर्वेक्षणातून ६७ टक्के देशवासीयांनी पार्ट्यांसाठी ‘कॅशलेस’चा पर्याय निवडल्याचे दिसले आहे. या सर्वेक्षणानुसार, तब्बल ५ हजार ५०० सामान्यांनी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे यंदा पार्टीसाठी खर्च करण्याचे ठरविले आहे, तर आणखी ५२ टक्के सामान्यांनीही थर्टी फर्स्टसाठी अधिक खर्चाची तयारी दर्शविली आहे. ३१ टक्के सामान्यांनी गेल्या वर्षीएवढेच पार्टीचे बजेट ठेवले आहे. अहवालानुसार, १७ टक्के सामान्यांनी स्वस्तात पार्टी करायचे ठरविले आहे, तर नोटाबंदीमुळे ३४ टक्के देशवासीयांनी पार्टीसाठीच्या खर्चात कपात केली (प्रतिनिधी)
नोटाबंदीनंतर पार्टीचे बुकिंगही कॅशलेस
By admin | Published: December 26, 2016 4:35 AM