शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

कॅशलेस प्रवासाबरोबर आता FASTag वर मिळणार ५ टक्के कॅशबॅक

By जयदीप दाभोळकर | Published: January 07, 2021 5:43 PM

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) या टोलनाक्यांवरही घेता येणार लाभ

ठळक मुद्दे११ जानेवारीपासून टोल नाक्यांवर या सुविधेची सुरूवातकॅशबॅकचे पैसे ते FASTag खात्यात जमा होणार

ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि वाहनांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी केंद्रानं FASTag अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे FASTag प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के कॅशबॅक दिलं जाणार आहे. ११ जानेवारी २०२१ ही या नव्या योजनेला सुरुवात होणार आहे.पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे. “ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,” असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातर्गंत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.  FASTag स्टॉललाही सुरुवातफास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या  बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरु करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcarकारtollplazaटोलनाकाMumbaiमुंबईPuneपुणेBandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंक